Kamya Panjabi TV Show: काम्या पंजाबीने आतापर्यंत छोट्या पडद्यावर अनेक हिट मालिका दिल्या आहेत. आता तब्बल 10 महिन्यांच्या कालावधीनंतर ही अभिनेत्री पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार आहे. आता लवकरच ती संजोग (Sanjog) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या शोची कथा आई आणि दोन मुलींवर दाखवण्यात येणार आहे. या मालिकेतील काम्याच्या पात्राचे नाव गौरी असेल. या मालिकेत काम्याची व्यक्तिरेखा भौतिकवादी दाखवण्यात येणार आहे.
गौरी खूप स्वतंत्र आणि महत्वाकांक्षी आहे आणि तिच्या कुटुंबाची अनोख्या पद्धतीने काळजी घेते. काम्याच्या टीव्हीवर पुनरागमनाची बातमी ऐकून चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. काम्याला अखेरचे कलर्सवर प्रसारित झालेल्या 'शक्ती-अस्तित्व के एहसास की' या मालिकेत प्रीतोचे पात्र साकारताना पाहायला मिळालं होतं. या पात्रातील अभिनेत्रीचा अभिनय पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिलं होतं.