Igatpuri rave party : इगतपुरी रेव्ह पार्टीत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला अटक

नाशिकजवळ असलेल्या (Nashik) इगतपुरीत झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाला (Igatpuri rave party) धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला अटक केली आहे.

maharashtra rave party case marathi actress heena panchal caught with the drugs is under custody now
इगतपुरी रेव्ह पार्टीत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला अटक 
थोडं पण कामाचं
  • नाशिकजवळ असलेल्या (Nashik) इगतपुरीत झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाला (Igatpuri rave party) धक्कादायक वळण मिळालं आहे.
  • या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला अटक केली आहे.
  • बिग बॉस फेम अभिनेत्री हिना पांचाळसह (Heena Panchal) दोन कोरियोग्राफर आणि एक विदेशी महिलेला अटक करण्यात आली आहे.

नाशिक : नाशिकजवळ असलेल्या (Nashik) इगतपुरीत झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाला (Igatpuri rave party) धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला अटक केली आहे.   बिग बॉस फेम अभिनेत्री हिना पांचाळसह (Heena Panchal) दोन कोरियोग्राफर आणि एक विदेशी महिलेला अटक करण्यात आली आहे.

कोरोनाने थैमान घातले असताना तसेच दुसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभावीत असलेल्या नाशिक  जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टोरंट पर्यटन स्थळांवर गर्दी करण्यास बंदी असतानाही इगतपुरी परिसरातील स्काय ताज व्हीला आणि स्काय लगुन व्हीला या दोन बंगल्यामध्ये काही तरुण तरुणी अवैधरित्या पार्टी केली होती. या कारवाईत 10 पुरुष 12 महिला असे एकूण 22 जण अवैधरित्या ड्रग्स आणि हुक्क्याचे सेवन करतांना मद्यधुंद अवस्थेत सापडले होते. 

या छाप्यात कोकेनसह इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेले महिलांपैकी काही महिलांनी दाक्षिणात्य आणि बॉलिवूड फिल्ममध्ये अभिनय केलेला असून काही महिला कोरिओग्राफर आहे. यातील एक महिला ही परदेशी अर्थात इराणची नागरिक आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंबई येथील पीयूषच्या वाढदिवसानिम्मित इगतपुरी येथील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज व्हीला येथे मुंबई आणि पुणे येथील दहा पुरुष आणि बारा महिला यांनी रेव्ह पार्टी केली. या पार्टीत बॉलिवूडची अभिनेत्री हिना पांचाळसह 2 कोरियोग्राफर, एक विदेशी महिला अझार फारनुद यांच्या सह पीयुष शेट्टींया, आरव, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकिब ,वरून, बाफना, करिश्मा, चांदणी भटीजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, शनैया कौर, आषिता, शीना, प्रीती चौधरी, कौशिकी असे एकूण 22 जण ताब्यात आहे.

पोलिसांच्या छाप्यात घटनास्थळाहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्य जप्त करण्यात आल्यानं, या प्रकरणाचं गांभीर्य वाढले आहे. शहरातील महामार्गालगत आणि निसर्ग, डोंगर भागात विविध खाजगी बंगले आणि रिसॉर्ट असून यात अनेकदा रेव्ह पार्टी , मादक पदार्थाची तस्करी खुले आम सुरू असल्यानं स्थानिक पोलीस, प्रशासनाचा अजिबात धाक शिल्लक नसल्याची चर्चा स्थानकात कायम होत असते. या पार्टीतील,काहींनी रात्रीतूनच पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी