Rubina dilaik: रूबीना दिलाइकला 'या' कारणामुळे करावी लागणार सर्जरी

मालिका-ए-रोज
Updated Apr 15, 2019 | 21:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

टीव्ही शो शक्ति एक अस्तित्त्व के अहसास की मधली लीड एक्ट्रेस रूबीना दिलाइक गेल्या काही दिवसांपासून खूप त्रासली आहे. रूबीनाला आता सर्जरी करावी लागणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय झालं रूबीनाला.

Rubina Dilaik
Rubina dilaik: रूबीना दिलाइकवर होणार सर्जरी, कारण जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Instagram

Rubina dilaik Surgery: टीव्ही शो शक्ति एक अस्तित्त्व के अहसास ची एक्ट्रेस रूबीना दिलाइक टीव्ही शोमधली पॉप्युलर एक्ट्रेस आहे.  वेगळी थीम असल्यामुळे रूबीनाच्या शोला बरेच अटेशन मिळतं. नेहमीच इंस्टाग्रामवर फोटोज शेअर करणारी रूबीना यादिवसात त्रासली असल्याचं समजतंय. तिच्या त्रासाचं कारण आता समजते आहे. रूबीनाच्या हाताला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तिला आता सर्जरी करावी लागणार आहे. 

काही महिन्यांपूर्वी रूबीनाला आपल्या शोच्या एका एपिसोडचं शूटींग करताना सेटवर दुखापत झाली होती. त्यानंतर रूबीनानं त्या दुखापतीवर लक्ष्य दिलं नाही. त्यामुळे रूबीनाला त्या दुखापतीचा त्रास होऊ लागला. आता ही दुखापत रूबीनासाठी त्रास बनली आहे. दुखापतीमुळे रूबीनाला शूट करताना बऱ्याच अडचणी येत आहेत.  यामुळे तिला हाताची सर्जरी करावी लागणार आहे. शोचं शूटिंग करताना रूबीनाच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी रूबीनानं इंस्टाग्रामवर देखील फोटोज शेअर केला होता. ज्यात तिच्या हाताला बँडेज लावलं होतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

?

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik) on

 

रूबीना आता 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा ' या शोमध्ये स्पिन ऑफमध्ये दिसेल. रूबीनानं २००८ मध्ये छोटी बहू- सिंदूर बिन सुहागन या मालिकेतून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर रूबीना सास बिना ससुराल, पूर्नविवाह आणि जिनी और जूजू यासारख्या शोमध्ये दिसली. शक्ति या मालिकेत रूबीनासोबत विवियन डीसेना लीड रोल करत आहे. 

 

को एक्टर अविनाश सचदेवला डेट केल रूबीनानं 

रूबीनानं गेल्यावर्षी बॉयफ्रेन्ड अभिनव शुक्लासोबत लग्न केलं. मात्र लग्नापूर्वी रूबीनानं आपला को एक्टर अविनाश सचदेवला देखील डेट केलं आहे. रूबीना आणि अविनाश यांच्या प्रेमाची सुरूवात छोटी बहू या मालिकेच्या सेटवर झाली होती. 

 

 

सुरूवातीला दोघं एकमेकांशी जास्त बोलत नव्हते. मात्र त्यानंतर आऊटडोर शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. रूबीनानं अभिनव शुक्लाशी लग्न केलं. हिमाचलमध्ये हे लग्न पार पडलं. रूबीना आणि अभिनव या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Rubina dilaik: रूबीना दिलाइकला 'या' कारणामुळे करावी लागणार सर्जरी Description: टीव्ही शो शक्ति एक अस्तित्त्व के अहसास की मधली लीड एक्ट्रेस रूबीना दिलाइक गेल्या काही दिवसांपासून खूप त्रासली आहे. रूबीनाला आता सर्जरी करावी लागणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय झालं रूबीनाला.
Loading...
Loading...
Loading...