[VIDEO] पाहा चंद्राचं दर्शन होताच टीव्ही सेलिब्रिटींनी कसा साजरा केला 'हा' सण

TV celebs Karwa Chauth celebration:  टीव्ही जगातील अनेक सेलिब्रिटींनी बुधवारी करवा चौथ व्रत केलं. पाहा सेलिब्रिटींनी नेमका कसा साजना केला हा सण

karvachauth
[VIDEO] पाहा चंद्राचं दर्शन होताच टीव्ही सेलिब्रिटींनी कसा साजरा केला 'हा' सण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टीव्ही सेलिब्रिटींनी साजरा केला करवा चौथ
  • करवा चौथ साजरा करताना सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केले फोटो
  • पाहा सेलिब्रिटींचा नवा लूक

मुंबई: बुधवारी देशभरात करवा चौथ साजरा करण्यात आला. हा सण फक्त सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रिटींनी देखील साजरा केला. यावेळी केवळ पत्नीच नव्हे तर अनेक पतींनीही बायकोला पाठिंबा देत हा उत्सव पूर्ण उत्साहात साजरा केला. बर्‍याच सेलेब्सचे फोटो देखील सोशल मीडियावर सातत्याने येत असल्याचे काल आपल्याला पाहायला मिळालं. येथे आम्ही आपल्याला एका सेलिब्रिटीने कशा प्रकारे हा सण साजरा केला ते दाखविणार आहोत.

टीव्ही कॉमेडियन भारती सिंगने हा दिवस कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथसोबत साजरा केला. चंद्र बाहेर आल्यानंतर भारतीने तिचा पती हर्षाच्या हातून पाणी घेतलं आणि आपला उपवास सोडला. टीव्ही स्टार धीरज धूपर यांच्या पत्नीनेही करवा चौथचा उपवास पाळला आणि पूजेनंतर तिने आपला  उपवास सोडला.

या व्हिडिओमध्ये बाकीच्या सेलेब्रिटींनी करवाचौथचा उपवास कसा ठेवला ते आपण येथे पाहू शकता आणि अहवालासह करवाचौथच्या दिवसाच्या सेलिब्रिटींचे फोटो पाहू शकता.

विशेष म्हणजे बुधवारी सकाळपासूनच करवा चौथ सोशल मीडियावर ट्रेंड होत होता. यावेळी अनेक सेलेब्सच्या नव्या लूकचे फोटो समोर येत होते. संध्याकाळी चंद्र बाहेर आल्यानंतर त्याचे देखील फोटो समोर आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी