Rahul Vaidya Excited for mika singh Swayamvar: मिका सिंग लवकरच बोहल्यावर चढणार आहे. मिकाने त्याच्या लग्नाची सगळी तयारी केली आहे. बॉलीवूड गायक त्याच्या टीव्ही शो स्वयंवर-मिका दी वोटीमध्ये त्यांची भावी पत्नी शोधण्यासाठी सज्ज आहे.
या कार्यक्रमात मिकाला मार्गदर्शन करण्यासाठी त्याचे मित्र आणि ओळखीचे बरेच लोक येत असतात. ताज्या माहितीनुसार, बिग बॉसचा स्पर्धक असलेला मराठमोळा गायक राहुल वैद्यची देखील आता या शोमध्ये एंट्री होणार आहे.
राहुल मिका सिंगला चीअर करण्यासाठी येणार आहे. मिकाला लग्नासाठी प्रवृत्त करण्यासाठी राहुल येथे आला आहे. याविषयी बोलताना राहुल वैद्य म्हणाला की, मिकाने लवकर लग्न करावे अशी त्याची इच्छा आहे. राहुलने मिका सिंगचे काही गुपितंही यावेळी उघड केली आहेत.