Bhagya Dile Tu Mala Highlights, मुंबई : "भाग्य दिले तू मला" या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. राजवर्धन याला कावेरीशी लग्न करायचे असेल तर त्याला गावात राहून पैसे कमविण्याच अट तात्यांनी टाकली आहे. ती पूर्ण करण्यासाठी तो चिऱ्याच्या खाणीत काम करत आहे. यावेळी त्याला काम करताना लागते आणि बोटातून रक्त येते ते पाहण्यासाठी कावेरी चिऱ्याच्या खाणीवर जाते. (snake enter in Raj hut Bhagya Dile Tu Mala Today Promo- Episode 213 Highlights Colors Marathi )
राजवर्धनच्या बोटातून वाहणाऱ्या रक्त पाहून कावेरीचा जीव कासावीस होतो. त्यामुळे ती त्याला मिठी मारते. हा सर्व प्रकार गावातील एक गावकरी पाहतो. याची तक्रार तो थेट तात्यांकडे करतो. मग काय होते आज पाहा.
दुसऱ्या सीनमध्ये राजवर्धनसाठी कावेरी पिठलं भाकरी घेऊन येते. त्यावेळी राज तिचा हात पकडतो आणि तिला आय लव यू म्हणायला सांगतो पण कावेऱी काहीच बोलत नाही. पुढे काय होतं या रोमँटिक सीनमध्ये पाहा आजचा भाग.
तिसऱ्या सीनमध्ये राजवर्धन पिठलं भाकरी खात असताना अचानक त्याच्यासमोर साप येतो. त्यावेळी राजची तंतरते. पुढे काय होते पाहा आजचा भाग...