[VIDEO] ...तेव्हा सुशांत माधुरी दीक्षितसमोर रडला होता ढसाढसा  

मालिका-ए-रोज
Updated Jun 15, 2020 | 14:07 IST

Sushant Singh Rajput Mother tribute performance: माधुरी दीक्षितच्या समोर सुशांतने 'झलक दिखला जा 4' मध्ये आपल्या आईच्या आठवणीत एका परफॉर्मन्स केला होता ज्याचा व्हिडिओ आथा व्हायरल होत आहे.

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर एक व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
  • माधुरी दीक्षितसमोर आपले अश्रू रोखू शकला नव्हता सुशांत
  • सुशांत सिंह याचा 'झलक दिखला जा 4' परफॉर्मन्स होतोय व्हायरल

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आपल्या आईला गमावलं होतं. (Sushant Singh Rajput Mother) खरं तर प्रत्येक व्यक्तीसाठी हा क्षण कोलमडून जाणारा असाच असतो. आपण याची कल्पना देखील करु शकत नाही की, त्या किशोरवयीन मुलाच्या मनावर नेमका काय परिणाम झाला असेल. आता सुशांतने देखील वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सुशांतने काल (रविवार) वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

सुशांत सिंह याच्या निधनाची बातमी जशी समोर आली तसं त्याने आपल्या दिवंगत आईच्या आठवणीत केलेल्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये 'झलक दिखला जा 4' मध्ये त्याने केलेला परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत म्हणतो की, त्याच्या आईला छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंद मिळायचा. सुशांत पुढे म्हणतो की, 'जर ती जिवंत असते तर तिला पाहून खूप आनंद झाला असता.' यावेळी सुशांतला आपले अश्रू देखील अनावर झाले होते.

यादरम्यान, अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) देखील तिथे उपस्थित होती. जेव्हा माधुरीने सुशांतच्या नृत्याची प्रशंसा केली आणि त्याच्या आईबद्दल बोलते तेव्हा सुशांत सिंह  राजपूत आपले अश्रू रोखू शकत नाही. 

वांद्रे येथील घरात घेतला गळफास 

सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या नोकराने आणि मित्रांनी त्याला सर्वप्रथम त्या अवस्थेत पाहिलं आणि पोलिसांना कळविले. छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेतून बरीच लोकप्रियता मिळवली होती. ज्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला होता. त्याने कोई पो चे, धोनी, छिचोरे, पीके यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. या प्रत्येक सिनेमात त्याने आपली छाप सोडली होती. 

'या' व्यक्तीशी झाली होती शेवटची बातचीत 

सुशांत सिंह राजपूत यांने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपला मित्र महेश शेट्टीला फोन केला होता. 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेत एकत्र काम केल्यानंतर सुशांत महेशला आपला भाऊ मानू लागला होता. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार महेश शेट्टीने पोलिसांना दिलेल्या जबाबत असे म्हटले आहे की, सुशांतने काही दिवसांपासून अँटी-डिप्रेशन औषधं घेणं बंद केलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी