आता ‘दयाबेन’ची निवड करू शकतील फॅन्स, तारक मेहताच्या मेकर्सची घोषणा

मालिका-ए-रोज
Updated May 04, 2019 | 18:51 IST | टाइम्स नाऊ हिंदी

मालिकेच्या निर्मात्यांनी ऑनलाईन वोटिंगद्वारे प्रेक्षकांचा सल्ला घेऊन या भूमिकेसाठी कलाकाराचं नाव निवडलं जाणार असल्याचं जाहीर केलंय. जाणून घ्या दिशा वकानी म्हणजेच ‘दयाबेन’च्या पुनरागमानबद्दल काय म्हणाले निर्माते

dayeben
दयाबेन  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये दयाबेनच्या पुनरागमनाबद्दलचा सस्पेंस कायम आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी आपल्या मुलीच्या जन्मानंतर शोमधून गायब झाली आहे. ताज्या माहितीनुसार मालिकेचे निर्माते ऑनलाईन वोटिंग द्वारे प्रेक्षकांचा सल्ला घेणार आहेत की या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीचं नाव फायनल करायचं.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित मोदीनं झूम टिव्हीला दिलेल्या माहितीनुसार,आता दयाबेनच्या बाबतीत सांगणं थोडं कठीण आहे. ही एक प्रक्रिया आहे. मी ऑनलाईन प्रेक्षकांकडूनही सल्ला घेणार आहे, प्रेक्षकांना कोणत्या अभिनेत्रीला दयाबेन म्हणून बघायला आवडेल ते.’

असित मोदी यांनी सांगितलं की, आम्ही जो पण निर्णय घेऊ तो प्रेक्षकांना नक्की आवडेल. यासाठी अजून थोडा वेळ आहे. आम्हाला आणखी काही एपिसोड दयाबेन शिवाय शूट करावे लागतील. दया भाभी परत नक्की येईल, एव्हढं मात्र मी सांगू शकतो.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DISHA VAKANI (@dishavakanioffical) on

 

शो कधी कुणासाठी थांबतो

असित मोदी यांनी सांगितलं की, मला विश्वास आहे की आम्ही जो कोणता निर्णय घेऊ तो प्रेक्षकांना आवडेल. अजून काही ठरलेलं नाही. मात्र शक्यता काहीही असू शकते. खूप चांगले चांगले कलाकार आहेत. दया भाभी ही मालिकेची हीरोईन आहे. जर ती परत येते तर सोन्याहून पिवळं होईल.

असित मोदी यांनी दिशा वकानी यांच्या पुनरागमनाबद्दल सांगितलं, ‘मी त्यांच्याकडे पण विनंती करतो की त्या आमच्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये परत यावं. आपल्या प्रेक्षकांनाही असंच वाटतं. ही मालिका पण आमची नाही प्रेक्षकांची आहे. आम्हाला आशा आहे, पण त्यांना वाटत नसेल तर मालिका आमच्यासाठी मोठी आहे, ती कुणासाठी थांबत नाही.’

 

 

‘चिडिया घर’च्या अभिनेत्रीला अप्रोच?

मीडिया रिपोर्ट्स नुसार ‘दयाबेन’ची भूमिकेला रिप्लेस करण्यासाठी सर्वात पहिलं नाव अमी त्रिवेदीचं समोर येत होतं. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ सोबतच्या बातचीतमध्ये अमीनं शोसाठी कुणी संपर्क केल्याच्या बातमीचं खंडन केलं.

 

 

अमीनं सांगितलं होतं की, ‘मला संपर्क केला गेला नाही, मात्र माझ्या मित्रांनी मला सांगितलं की मला ही भूमिका साकारायला हवी आणि मी या भूमिकेत चांगली दिसेन’. मला भूमिकेसाठी ऑफर मिळाली नाही. ना ही माझ्यापर्यंत निर्मात्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला. अमीनं सब टिव्हीवरील मालिका ‘चिडिया घर’ आणि ‘सजन रे झूठ मत बोलो’मध्ये काम केलं आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी