नागिन-6 च्या सेटवर तेजस्वी प्रकाश आणि मेहक चहल, पाहा कोणाचा लूक जास्त भारी?

Tejasswi Prakash and Mahek Chahal sets of Naagin 6: निर्मात्यांनी आता नागिन-6 च्या कथेबाबत एक मोठी योजना आखली आहे. दरम्यान, आता शोचा खलनायक आणि नायक सेटवर एकत्र पाहायला मिळाले आहेत.

tejasswi prakash and mehak chahal spotted on the sets of naagin 6
नागिन-6 च्या सेटवर तेजस्वी प्रकाश आणि मेहक चहल, पाहा कोणाचा लूक जास्त भारी? 

Tejasswi and Mahek Naagin 6: नागिन-6 आपल्या मसालेदार कथेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. कथेतील मोठा ट्विस्ट असा आहे की ऋषभ खरोखर मेलेला नाही आणि त्याचा मृत्यू हा एक मोठा ड्रामा आहे. नवीन ट्विस्टनुसार, प्रथा आणि ऋषभ त्यांच्या सर्व शत्रूंवर विजय मिळवून सर्वात भव्य मार्गाने एकत्र येतील. 

नागिन-6 च्या कथेबाबत निर्मात्यांनी आता मोठी योजना आखली आहे. दरम्यान, आता शोचा खलनायक आणि नायक सेटवर एकत्र पाहायला मिळाले आहेत. आम्ही बोलत आहोत तेजस्वी प्रकाश आणि मेहेक चहलबद्दल. 

या दोघांचं ऑनस्क्रीन वैर आपण पाहिलंय पण ऑफस्क्रीन या अभिनेत्रींची केमिस्ट्री चांगलीच आहे. सेटवर मेहक भारतीय पोशाखात तर तेजस्वी वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली. 

नागिन-6 शो ऑक्‍टोबर 2022 मध्ये बंद होण्याची चर्चा सुरु होती. आता या मालिकेशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आलं आहे की त्याला डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी