[VIDEO]: टीव्ही अभिनेत्री निती टेलर लवकरच विवाहबंधनात, साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियात केले शेअर

मालिका-ए-रोज
Updated Aug 14, 2019 | 22:59 IST | Zoom

निती ने बॉयफ्रेंड परिक्षित बावासह फोटो सोशल मिडियावर शेअर करून चाहत्यांना तिच्या नात्याबद्दल सांगूत खुशखबर दिली आहे. त्यानंतर चाहत्यांनी आणि टीव्ही क्षेत्रातील मित्रांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरवात केली आहे.

Niti Taylor Mehandi Ceremony
टीव्ही अभिनेत्री निती टेलर   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: 'प्यार का बंधन' या कार्यक्रमातून टीव्हीमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री निती टेलरने अलीकडेच तिचा बॉयफ्रेंड परिक्षित बावाबरोबर तिच्या नात्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिने आपले आणि परिक्षितचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निती म्हणाली, ती लवकरच तिचा बॉयफ्रेंड परिक्षितसोबत लग्न करणार आहे. दरम्यान, तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यामध्ये निती आपल्या कुटूंबियांसह मेहंदी सोहळ्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसली.

‘इश्कबाज’या मालिकेत नितीची जोडी नकुल मेहता म्हणजेच शिवांशसोबत दिसली होती. जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. या व्यतिरिक्त ती ' कैसी ये यारियान' मध्ये पार्थ समथानसोबत दिसली होती. शोमध्ये नितीची पार्थबरोबर जोडी यशस्वी ठरली. या मालिकांखेरीज निती तेलुगू चित्रपट आणि अनेक संगीत व्हिडिओंमध्ये दिसली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...