अभिनेता Karan Mehra ला जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Karan Mehra: टीव्ही अभिनेता करण मेहरा याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आही. या घटनेनंतर करण मेहराने पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला आहे. 

tv actor karan mehra getting death treats watch video entertainment news in marathi
अभिनेता Karan Mehra ला जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ 

Karan Mehara news updates: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्यावर्षी अभिनेत्री निशा रावलने करण मेहरावर अनेक आरोप करत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यामुळे अभिनेत्याला अटकही झाली होती. आता नुकत्याच एका मुलाखतीत 'ये रिश्ता क्या कहलाता है' चा अभिनेता करण मेहरा याने खुलासा केला की, निशा ही एका रोहित साटिया नावाच्या मुलाला डेट करत आहे.

मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा मिळत आहे. त्याला कोण फोन करुन त्रास देत आहे हे माहिती नाहीये. फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या आई-वडिलांना आणि भावाला सुद्धा धमकीचे फोन कॉल्स येत आहेत. यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. अभिनेता करणने या संदर्भात पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी