'या' अभिनेत्रीनं घटस्फोटावर ट्रोलर्सला पत्र लिहून दिलं प्रत्युतर

मालिका-ए-रोज
Updated Apr 23, 2019 | 12:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

टीव्ही एक्ट्रेस वाहबिज दोराबजीनं सोशल मीडियावर ओपन लेटर लिहिलं आहे. ओपन लेटरच्या माध्यमातून तिनं घटस्फोट आणि पोटगीच्या रकमेवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे. 

Vahbiz Dorabjee
'या' अभिनेत्रीनं घटस्फोटावर ट्रोलर्सला पत्र लिहून दिलं प्रत्युतर  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: टीव्ही कपल वाहबिज दोराबजी आणि विवियन डीसेना यांचं घटस्फोट प्रकरण सध्या चर्चेत आहे. वाहबिजनं विवियनकडून २ कोटी रूपये पोटगीसाठी मागितल्याचा दावा काही  रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. आता वाहबिजनं सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून यावर प्रतिक्रीया दिली आहे. 

वाहबिज हिनं इंस्टाग्रामवर लिहिलं की, हे पत्र त्या लोकांसाठी ज्यांना माझ्या घटस्फोटाची चिंता आहे. तुम्ही लोकं कधी स्वतःच्या आयुष्यात वाईट काळातून गेला आहात का, ज्या काळात जेव्हा स्वतःला वाटतं माझ्यासोबतच असं का घडतं ? तेव्हा विचारा स्वतःला की कसं वाटतं.  आपल्या निष्ठावान आयुष्यातून प्रत्येक गोष्ट प्रश्नांच्या मार्गानं आली आहे. हा प्रश्न केवळ तुमच्या जवळचे लोकं विचारत नसून ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाही ते देखील विचारत आहेत. 

पुढे वाहबिजनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, माझं आयुष्य हे काही सर्कस नाही आहे. प्रत्येक सेलिब्रेटी ही आधी मनुष्य असते. मी एक मुलगी, बहिण आणि कोणाची तरी मैत्रिण देखील आहे. एक माणूस होण्याच्या नात्यानं मला माझ्या काही तरी भावना आहेत. माझं देखील डोकं आणि मला देखील त्रास होतो. मी सतत हसत असते याचा अर्थ असा नाही की मला त्रास होत नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The Fire in her eyes spoke of a Story she'd Never tell.... Photography:- @firozadorabjee

A post shared by Vahbiz Dorabjee (@vahbz) on

रिपोर्ट काय सांगतो

मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, विवियन आणि वाहबिज यांचा घटस्फोट पोटगीमुळे थांबला आहे. याआधी वाहबिजनं हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटलं होतं की, एक पत्नी आपल्या पतीकडून घटस्फोटानंतर पैशांचा २० टक्के हिस्सा मागू शकते. दरम्यान याबाबतीत मला काही प्रतिक्रीया द्यायची नाही आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Your Questions, My Answers.....Now My Questions, And I Say No More Answers....Lets Bring It To A STOP!!!!

A post shared by Vahbiz Dorabjee (@vahbz) on

वाहबिजनं म्हटलं की, लोकं अशा प्रतिक्रीया देत आहेत की, जसं काय कोणत्या तरी सेलिब्रेटीचा पहिला घटस्फोट आहे. पोटगीच्या रकमेवर लोकं इतकी चिंता का करत आहेत ? वाहबिजनं पुढे म्हटलं की, माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण करण्यासाठी बऱ्याच कथा तयार करण्यात आल्या. हे सर्व केवळ मलाच घटस्फोटासाठी दोष देत आहेत. 

२०१३ ला झालं होतं लग्न 

वाहबिज दोराबजी आणि  विवियन डिसेनानं यांचं  २०१३ ला लग्न झालं होतं. जवळपास ४ वर्षांनंतर २०१७ मध्ये दोघं वेगळे झाले होते. वाहबिजनं म्हटलं होतं की, विवियन आता एक क्लोज चॅप्टर आहे. आम्ही दोघं आमच्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. 

वाहबिज आणि विवियन पॉप्युलर शो प्यार की ये एक कहानी या सेटवर पहिल्यांदा भेटले. टीव्ही सिरीयल प्यार की ये एक कहानी च्या शूटींग दरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. डिसेंबर २०११ ला दोघांनी साखरपुडा केला त्यानंतर गुपचुप लग्न देखील केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'या' अभिनेत्रीनं घटस्फोटावर ट्रोलर्सला पत्र लिहून दिलं प्रत्युतर Description: टीव्ही एक्ट्रेस वाहबिज दोराबजीनं सोशल मीडियावर ओपन लेटर लिहिलं आहे. ओपन लेटरच्या माध्यमातून तिनं घटस्फोट आणि पोटगीच्या रकमेवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह