[VIDEO] अभिनेत्री Gracy Singhचं तांडव नृत्य

Santoshi Maa Sunayein Vrat Kathayein Tandav Nritya: अभिनेत्री ग्रेसी सिंग हिने संतोषी माँ साकारत असताना आता तांडव नृत्य देखील केलं आहे. पाहा तिचा हा खास व्हिडिओ.

gracy singh
[VIDEO] अभिनेत्री Gracy Singhचं तांडव नृत्य  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: 'संतोषी माँ सुनाए व्रत कथाएं' या टीव्ही मालिकेमध्ये संतोषी माँच्या अवतारात अभिनेत्री ग्रेसी सिंग ही आपल्याला दिसणार आहे. पारंपारिक भारतीय संगीत आणि नृत्यासह ती प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे.  लवकरच ग्रेसी एका भागात संतोषी माँच्या लूकमध्ये तांडव नृत्य करताना दिसणार आहे. नुकतंच ग्रेसी ही वीणा वाजवताना देखील पाहायला मिळाली होती. 

प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना ग्रेसी सिंगने याबाबत बोलताना सांगितलं की, तिला नेहमीच तांडव नृत्य आवडत आलं आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात हे नृत्य करावं असं तिचं स्वप्न होतं. याबाबत ग्रेसी असं म्हणाली की, 'संतोषी माँ ही तांडव नृत्य करताना दिसणार आहे कारण की, पृथ्वीवरील वाईट घटनांमुळे ती दु:खी झाली आहे.' 

यावेळी अभिनेत्री ग्रेसी सिंग हिने अत्यंत तल्लीनतेने हे नृत्य केलं आहे. जे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी