CID पुन्हा सुरु होणार?, शिवाजी साटम यांनी दिले संकेत

Shivaji Satam on CID: टीव्ही सीरियल सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम द क्रिएटर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला पोहोचले. यादरम्यान त्यांनी सीआयडीच्या नव्या सीझनबाबत संकेत दिले आहेत.

will cid return to screen soon acp pradyuman fame shivaji satam gave big hint
CID पुन्हा सुरु होणार?, शिवाजी साटम यांनी दिले संकेत 

Shivaji Satam on CID new season: देशातील सर्वाधिक काळ चालणारी टीव्ही मालिका सीआयडीच्या टीमचे नुकतंच रियुनियन झालं. द क्रिएटर चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान या मालिकेचे कलाकार शिवाजी साटम (एसीपी प्रद्युम्न), दयानंद शेट्टी (दया) पुन्हा एकत्र आले. 

त्याचवेळी सीआयडी पुन्हा सुरु होणार का? अशी विचारणा अभिनेते शिवाजी साटम यांना करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, 'कदाचित, कुणास ठाऊक. निर्माते आणि इतर यावर विचारमंथन करत आहेत. मात्र, ती पूर्वीसारखी सीआयडी मालिका नसेल बहुधा. पण ही मालिका लवकरात लवकर सुरु व्हावी एवढीच मी प्रार्थना करतो. आता काहीही बोलणे घाईचे होईल.' 

तथापि, या मालिकेतील आमच्या जवळच्या काही लोकांनी सांगितले की, सीआयडी मालिका सुरु करण्यासाठी निर्माते हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी