[VIDEO]: 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये साजरा झाला जन्माष्टमीचा उत्सव

मालिका-ए-रोज
Updated Aug 25, 2019 | 13:08 IST | Zoom

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत जन्माष्टमी साजरी झाली. यानिमित्ताने या कार्यक्रमामधील कायरव भगवान श्रीकृष्णाच्या ड्रेसमध्ये दिसला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कृष्ण बनल्याचा आनंद दिसून आला.

janmashtami celebration 2019
'ये रिश्ता क्या कहलाता है'  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हणून साजरा करण्यात येणारा हिंदू उत्सव म्हणजे जन्माष्टमी उत्सव सध्या देशभर साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जन्माष्टमीचा उत्साह टीव्ही शोमध्ये सुद्धा दिसला. प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये जन्माष्टमी साजरी केली गेली. या ठिकाणी कायरव छोट्या कृष्णाच्या वेशात दिसला. अलीकडेच शोच्या कायरव आणि वेदिकाने झूमशी खास चर्चा केली होती.

या दरम्यान, वेदिकाने तिच्या जन्माष्टमीशी संबंधित जुन्या आठवणी सांगितल्या. तिने सांगितले की, आम्ही लहानपणी झांकीची सजावट करायचो. त्याच वेळी, छोट्या कायरवने सांगितलं की, त्याला भगवान श्रीकृष्ण बनल्याचा आनंद होत आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये कार्तिक मनिष गोयंका उर्फ ​​मोहसीन खान आणि नायरा कार्तिक गोएंका उर्फ ​​मिशिका जैन मुख्य भूमिकेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...