The Kerala Story Box Office Collection: तिसऱ्या वीकेंडपर्यंत चित्रपटाने केली जबरदस्त कमाई

The Kerala Story Box Office Collection Day 17: बहुचर्चित 'द केरळ स्टोरी' ची बॉक्स ऑफिस कमाई थांबण्याचे नावच घेत नाही आहे, प्रदर्शनाच्या तिसऱ्या वीकेंडनंतर ही या चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. सतराव्या दिवशीपर्यंत हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या अगदी जवळ आला आहे. या चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकूया.

Updated May 22, 2023 | 07:26 PM IST

The Kerala Story Bos Office Collection Day 17

तिसऱ्या आठवड्यानंतर ही केरळ स्टोरीला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे

फोटो साभार : Times Now Digital
थोडं पण कामाचं
  • 'द केरळ स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली.
  • चित्रपटाने 17व्या दिवशी दुहेरी अंकात कमाई केली आहे.
  • आता या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा गाठला आहे.
The Kerala Story Box Office Collection Day 17: द केरळ स्टोरी या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडनंतर 200 कोटींचा टप्पा पार करण्याच्या अगदी जवळपास बाजी मारली आहे. अनेक वादानंतरदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असून या वर्षातील दुसरा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 17 दिवस झाले आहेत, तरीही चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट लव्ह जिहाद आणि दहशतवाद यासारख्या गंभीर विषयांवर भाष्य करतो.

200 कोटींच्या जवळपास पोहोचला 'द केरळ स्टोरी'

अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' ने 17 व्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. फिल्मबीटच्या रिपोर्टनुसार, अदा शर्माचा चित्रपट द केरळ स्टोरी 17 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 12 कोटींची कमाई करू शकतो. यासोबतच चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 200 कोटींच्या अगदी जवळ पोहोचले होते. चित्रपटाने 17व्या दिवसानंतर 198-199 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.

'द केरळ स्टोरी' चित्रपटावरून वाद

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबाबत देशात बराच वाद झाला होता, अनेक लोक या चित्रपटाला केवळ धार्मिक तेढ निर्माण करणारा चित्रपट तसेच एका विशिष्ट संघाचा प्रचार म्हणत आहेत दरम्यान या चित्रपटाला मौखिक प्रसिद्धी अधिक मिळाली आहे. देशातील काही राज्यांमध्ये बंदी असतानाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited