Vaibhavi Upadhyaya Dies: साराभाई वर्सेस साराभाई फेम अभिनेत्रीचं अपघाती निधन

Vaibhavi Upadhyaya Dies: मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय (वय-32) हिचं अपघाती निधन झालं. 'साराभाई वर्सेस साराभाई' या लोकप्रिय मालिकेतून वैभवी घराघरात पोहोचली होती.

Updated May 24, 2023 | 09:57 AM IST

Vaibhavi Upadhyaya Death, vaibhavi upadhyaya,vaibhavi upadhyaya news,vaibhavi upadhyay accident

Vaibhavi Upadhyaya Death, vaibhavi upadhyaya,vaibhavi upadhyaya news,vaibhavi upadhyay accident

फोटो साभार : BCCL
Vaibhavi Upadhyaya Death: मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी आहे. टीव्ही अभिनेत्री वैभवी उपाध्याय (वय-32) हिचं अपघाती निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मंगळवारी झालेल्या भीषण कार अपघातात वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवीचं पार्थिव बुधवारी सकाळी मुंबईत आणण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. वैभवीच्या अकाली एक्झिटने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेतून वैभवी ही जास्मीनच्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला आली होती. या भूमिकेनेच तिला विशेष ओळख मिळवून दिली होती. मालिकेचे निर्माते जेडी मजेठीया यांना वैभवीच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे.

अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये केलं काम...

वैभवीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं. ती सीआयडी, अदालत आणि साराभाई वर्सेस साराभाईमध्ये दिसली. साराभाई मालिकेतील 'जास्मीन' ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली.

काय म्हणाले जेडी मजेठीया?

वैभवी ही एक सुंदर आणि अफलातून अभिनेत्री होती. आयुष्य किती अनिश्चित आहे, हे वैभवीच्या अकाली जाण्याने पुन्हा एकदा दिसून आले. मला खरंच खूप मोठा धक्का बसला आहे, अशा शब्दांत जेडी मजेठीया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दीपिका पादुकोणसोबत दिसली होती या चित्रपटात...
वैभवी उपाध्यायने 2020 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत 'छपाक' आणि 'तिमिर' या चित्रपटांमध्ये काम केले होते. 'क्या कसूर है अमला का' आणि 'प्लीज फाइंड अटॅच्ड' या डिजिटल सीरिजमध्येही वैभवी दिसणार होती.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited