ट्रेंडिंग:

Sulochana latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन

Actress Sulochana Didi passes away: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Updated Jun 4, 2023 | 08:01 PM IST

Sulochana latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन
थोडं पण कामाचं
  • दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात सुरू होते उपचार
  • वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sulochana Latkar passes away in Mumbai: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Actress Sulochna Latkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) दादर परिसरात असलेल्या सुश्रुषा रुग्णालयात सुलोचना दीदी यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.
गेल्या अनेक दिवसांपासून सुलोचना दीदी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी (4 जून 2023) त्यांची प्राणज्योत मालावली. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. शनिवारी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याची तसेच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

सुलोचना दीदी यांचा अल्प परिचय

  • 30 जुलै 1929 रोजी सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांचा जन्म झाला.
  • सुमारे 400 सिनेमांत सुलोचना दीदींनी भूमिका केल्या.
  • कोल्हापूर येथील खडकलाट गावच्या सुलोचना दीदी
  • चिमुकला संसार या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली
  • वहिनीच्या बांगड्या या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली
  • प्रपंच, मराठा तितुका मेळवावा, एकटी, मोलकरीण, सासूरवास हे गाजलेले मराठी सिनेमा
  • सुजाता, जॉनी मेरा नाम, कोरा कागज, कटी पतंग, बहारो के सपने, रेश्मा और शेरा हे गाजलेले हिंदी सिनेमा
  • बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'मजबूर' या सिनेमात भूमिका केली होती
  • पद्मश्री, महाराष्ट्र भूषण फिल्मपेअर जीवनगौरव या पुरस्कारांनी सुलोचना दीदी यांना सन्मानित करण्यात आले होते
  • भालजी पेंढारकर हे सुलोचना दीदी यांचे गुरू

2009 मध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित

मराठी-हिंदी सिनेमांतून सोज्वळ भूमिका रंगवणाऱ्या अभिनेत्री सुलोचना यांचा चेहरा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. पासष्टहून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत कलाकार-दिग्दर्शक-तंत्रज्ञांच्या अनेक पिढय़ांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी चित्रपटात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधानाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनीही ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

शरद पवारांनी ट्विट करत म्हटलं, "ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. सुमारे सहा दशके सुलोचना दीदींनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर…"

भाजप नेते विनोद तावडे यांनी सुद्धा ट्विट करत ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
ताज्या बातम्या

Vivo Price Drop: महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Price Drop     Vivo   2

Rahu Ketu Gochar 2023: दिवाळीपूर्वी राहू-केतूचे मोठे संक्रमण, या 5 राशी होणार मालमाल

Rahu Ketu Gochar 2023  -    5

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay  IIT  -      10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths     7   4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

         Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited