पुणे: Sawai Gandharva Mahotsav pune: 68 व्या सवाई गंधर्व महोत्सवाला आजपासून सुरू होत आहे. या 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात हा महोत्सव पार पडेल. 14 ते 18 डिसेंबर दरम्यान महोत्सव रंगणार आहे.
आज दुपारी 4 वाजता ज्येष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या गायनानं महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर शाश्वती मंडल आणि रतनमोहन शर्मा यांचे गायन होईल. कार्यक्रम स्थळी सुमारे 7 ते 8 हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य दिव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे.