लढवय्या इरफान खान 'या' सिनेमातून करतोय कमबॅक

झगमगाट
Updated Feb 17, 2020 | 16:31 IST

अभिनेता इरफान जवळजवळ दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. पाहा त्याच्या नव्या सिनेमाचा नवा ट्रेलर 

मुंबई: कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून नुकताच बरा झालेला बॉलिवूड अभिनेता इरफान खान हा 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर देखील नुकताच समोर आला आहे. २ मिनिट ५५ सेंकदाचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. या ट्रेलरमध्ये आपल्या सुरुवातीलाच पाहायला मिळेल की, इरफान खानची मुलगी म्हणजेच राधिका मदान हिचा शाळेत सत्कार केला जात असतो आणि इरफान फक्त दोन शब्द बोलतो. ज्यावर लोक खूपच हसतात. 

या ट्रेलरमधून सिनेमाची कहाणी जवळपास स्पष्ट होते. ही कहाणी एका मुलीचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका बापाची आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तब्बल १ कोटी रुपये गोळा करुन तिला लंडनला पाठवण्याची ही संघर्षकथा आहे. पण या सिनेमात अनेक ट्विस्ट आहेत. हा सिनेमा आपल्याला हसवेल, रडवेल देखील. याचा दावा स्वत: इरफान खाननेच केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...