Vikram Gokhale : मोदी प्रेमी गोखलेंनी काँग्रेस नेत्याच्या बायोपिकमध्ये काम केले होते

झगमगाट
Updated Nov 26, 2022 | 21:11 IST

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. विक्रम गोखले हे मराठी आणि हिंदीतील ज्येष्ठ नट असून नाटक, चित्रपट, मालिका आणि  वेबसीरीजमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची ठसा उमटवलाय.  पंतप्रधान मोदींचे चाहते असलेल्या विक्रम गोखले यांनी काँग्रेस नेत्याच्या एका बायोपिकमध्येही काम केलं होतं.

थोडं पण कामाचं
  • विक्रम गोखले सध्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत.
  • त्यांच्यावर उपचार सुरू असून गोखले उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये.
  • विक्रम गोखले हे मराठी आणि हिंदीतील ज्येष्ठ नट असून नाटक, चित्रपट, मालिका आणि  वेबसीरीजमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची ठसा उमटवलाय.

Vikram Gokhale : मुंबई : विज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते.  विक्रम गोखले हे मराठी आणि हिंदीतील ज्येष्ठ नट असून नाटक, चित्रपट, मालिका आणि  वेबसीरीजमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची ठसा उमटवलाय.  पंतप्रधान मोदींचे चाहते असलेल्या विक्रम गोखले यांनी काँग्रेस नेत्याच्या एका बायोपिकमध्येही काम केलं होतं. (actor vikram gokhale played role of congress leader sushil kumar shinde in his biopic dusari gosht)

विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आजी आणि वडिलांकडून मिळाला. विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या.  त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासुरात अभिनय केला होता. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले हे सुद्धा मराठीतील नावाजलेले नट होते. वजीर या चित्रपटात पिता पुत्रांची जोडी दिसली होती.

विक्रम गोखले यांनी मराठीसह, हिंदी, गुजराती आणि तेलुगु सिनेसृष्टीतही काम केलंय. मराठीत बाळा गाऊ कशी अंगाई, वजीर, माहेरची साडी, मुक्ता, नटसम्राट आणि नुकताच आलेला गोदावरी हे चित्रपट विशेष गाजले. हिंदीत अग्नीपथ, खुदा गवाह, सलीम लंगडे पे मत रो, हम दिल दे चुके सनम, तुम बिन भूल भुलैय्या आणि मिशन मंगल या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या.

विक्रम गोखले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रशंसक आहेत. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती असे विधान अभिनेत्री कंगणा रानौतने केले होते. तेव्हा कंगणा बरोबरच बोलली असे म्हणत विक्रम गोखले यांनी कंगणाची पाठराखण केली होती. तसेच गेल्या ७० वर्षात या देशात घाण साचली आहे नरेंद्र मोदी ते साफ करत आहेत असेही गोखले म्हणाले होते.

आता आम्ही तुम्हांला ज्या गोष्टीसाठी इतक्या वेळ थांबून ठेवले आहे, त्या गोष्टीवरून आता आम्ही पडदा उठवत आहोत.  पंतप्रधान मोदींचे प्रशंसक विक्रम गोखले यांनी काँग्रेसच्या एका बायोपिकमध्ये काम केले होते. २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात विक्रम गोखले यांनी अभिनय केला होता. देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता आणि या चित्रपटाचे नाव होतं दुसरी गोष्ट. गोखले यांनी शिंदे यांचीच भूमिका वठवली होती.

गोखले यांनी आपले आवडते नेते नरेंद्र मोदींचीही भूमिका पडद्यावर केली आहे. भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्यावर आधारित सोनी लिव या ओटीटीवर अवरोध ही सीरीज प्रदर्शित झाली होती. या सीरीजमध्ये गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारलीयं. आपले वैयक्तिक मतं काहीही असली तरी भूमिकेला न्याय देताना ती बाजूला ठेवण्याचे काम सच्चा कलाकार म्हणून विक्रम गोखले यांनी केलंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी