[VIDEO] अक्षय, अजय आणि रणवीर... तिघे एकत्र, पाहा हा भन्नाट ट्रेलर

झगमगाट
Updated Mar 03, 2020 | 16:22 IST

Sooryavanshi Trailer Out Watch Video: अक्षय कुमारचा मच अवेटेड सिनेमा सूर्यवंशीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि कतरिना कैफचा सॉलिड लूक पाहायला मिळणार आहे. 

मुंबई: बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा मच अवेटेड सिनेमा सूर्यवंशी याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सूर्यवंशी सिनेमातून बर्‍याच दिवसानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत दिसणार आहे. एकीकडे ट्रेलरमध्ये अक्षय कुमारची जबरदस्त अ‍ॅक्शन टायमिंग आहे तर दुसरीकडे कतरिना कैफ सॉलिड लूकमध्ये पाहायला मिळते आहे. सूर्यवंशी या चित्रपटातील अॅक्शन  सीक्वेन्स ते पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. 

ट्रेलर पाहून हे स्पष्ट झाले आहे की, रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात बरीच जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र, बऱ्याच काळानंतर अक्षय कुमार आणि कतरिना कैफची जोडी या चित्रपटात दिसणार आहे. अक्षय आणि कतरिना कैफशिवाय सूर्यवंशीमध्ये रणवीर सिंग आणि अजय देवगन हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  

ट्रेलरमध्ये अजय देवगन आणि रणवीर सिंगची एन्ट्री असलेला क्लायमॅक्स सीन खूपच मस्त आहे. क्लायमॅक्समध्ये सिंघम, सिंबा आणि सूर्यवंशी यांची टीम एकत्र लढताना दिसत होती. अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा हा चित्रपट २४ मार्च २०२० रोजी रिलीज होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी