Santosh Munde: शॉक लागून बीडचा टिक टॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू

झगमगाट
Updated Dec 14, 2022 | 14:59 IST

Tik Tok Star Santosh Munde: बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात राहणाऱ्या अन् महाराष्ट्रभर आपल्या हटक्या शैलीने नेटकऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा मृत्यू झाला आहे.

थोडं पण कामाचं
  • टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा मृत्यू झाला आहे.
  • संतोष मुंडेच्या मृत्यूनंतर बीडच्या धारूर तालुक्यातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
  • संतोष मुंडे याच्यासह बाबुराव मुंडे यांचा मृत्यू झाला आहे.

Tik Tok Star Santosh Munde: बीड:  बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात राहणाऱ्या अन् महाराष्ट्रभर आपल्या हटक्या शैलीने नेटकऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा-  Bhagya dile tu mala : भाग्य दिले तू मला मध्ये वैदेहीचा नको तो व्हिडिओ सापडला आणि झाला मोठा राडा 

विद्युत वाहक डीपीमधील फ्युज टाकत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाला आणि करंट लागून संतोष मुंडे याच्यासह बाबुराव मुंडे यांचा मृत्यू झाला आहे. संतोष मुंडेच्या मृत्यूनंतर बीडच्या धारूर तालुक्यातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संतोषचे लाखांवर फॉलोवर्स आहेत. अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो कायमच टिक टॉकवर व्हिडीओ तयार करायचा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी