Bigg Boss 16: दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस 16 मध्ये दिसणार का?, अफवांवर अभिनेत्रीनं सांगितली सत्य परिस्थिती

झगमगाट
Pooja Vichare
Updated Sep 23, 2022 | 11:21 IST

Will Divyanka Tripathi Dahiya Participate In Bigg Boss 16: सलमान खानचा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस त्याच्या नवीन सीझनसह प्रसारित होणार आहे. दरम्यान, या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी दिसणार असल्याच्या बातम्या येत होत्या. नुकतेच या टीव्ही अभिनेत्रीने मौन सोडले आणि चाहत्यांना सत्य सांगितले.

 Divyanka Tripathi
दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस 16 मध्ये दिसणार का? 
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bollywood actor Salman Khan) त्याच्या बिग बॉस या वादग्रस्त शोच्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे.
  • बिग बॉस सीझन 16 हा (controversial show Bigg Boss) शो 1 ऑक्टोबरपासून प्रसारित होणार आहे.
  • या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

मुंबई: Divyanka Tripathi Dahiya To Participate In Bigg Boss 16: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bollywood actor Salman Khan)  त्याच्या बिग बॉस या वादग्रस्त शोच्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. बिग बॉस सीझन 16  हा (controversial show Bigg Boss) शो 1 ऑक्टोबरपासून प्रसारित होणार आहे. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

असे बोलले जात आहे की, हा सीझन खूप धमाकेदार असेल ज्यामध्ये टीव्हीचे अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. दरम्यान, या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठीदेखील दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 

अधिक वाचा- शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या त्यामागील रंजक कथा

अशा परिस्थितीत अभिनेत्रीने आता या शोबाबत मौन सोडले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, 'माझे सर्व चाहते आणि दर्शक जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत, म्हणून मला हे ट्विट करावे लागेल. मी बिग बॉसमध्ये भाग घेणार नाही. तुम्ही जे काही ऐकत आहात किंवा वाचत आहात ते सर्व खोटे आहे. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी