प्रमोशनसाठी आली पण झाली ट्रोल, या लूकमुळे दिशा पटानीला यूजर्संनी ऐकवलं

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 12, 2022 | 15:05 IST

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी लवकरच अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्यासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' या सिनेमात दिसणार आहे.

bollywood actress Disha Patni
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी 
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी प्रमोशनसाठी एका मॉलमध्ये आली होती.
  • अभिनेत्रीने पिवळा ब्रॅलेट टॉप आणि जीन्स कॅरी केली होती.
  • लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' या सिनेमात दिसणार आहे.

मुंबई: Disha Patani Gets Trolled And Body Shamed: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी लवकरच अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्यासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' या सिनेमात दिसणार आहे. अलीकडेच अभिनेत्री अर्जुन कपूर आणि तारा सुतारियासोबत तिच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका मॉलमध्ये दिसली होती. 

अधिक वाचा-  आताच्या घडीची मोठी बातमी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे.

येथे अभिनेत्रीने पिवळा ब्रॅलेट टॉप आणि जीन्स कॅरी केली होती. या लूकमुळे लोकांनी अभिनेत्रीला खूप ट्रोल केलं. यासह दिशाला तिच्या सिनेमातील कलाकारांसोबत पुन्हा एकदा स्पॉट केले गेले, जेथे तिने अतिशय कॅज्युअल कपडे घातले होते. ती पांढऱ्या ब्रॅलेट टॉपमध्ये दिसत होती.

यावेळी देखील अभिनेत्रीला ट्रोल करताना एका यूजरने लिहिले की, 'ही कसे कपडे घालते यापेक्षा ऊर्फी चांगले ड्रेस घालते' तर दुसऱ्या यूजरने लिहिले की 'अख्खी हड्डी-काडी बनली आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी