Deepika Padukone:शाहरूखचा आगामी सिनेमा 'जवान' मध्ये दीपिका, कॅमिओच्या शूटिंगला सुरूवात

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 22, 2022 | 15:46 IST

Deepika Padukone CAMEO in film Jawan:दीपिका पदुकोण शाहरुख खानसोबत शूटींग करण्यासाठी चेन्नईला पोहोचली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे...

Deepika Padukone CAMEO
दीपिका पदुकोण चेन्नईमध्ये 
थोडं पण कामाचं
  • शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' (Jawaan) सिनेमा डबल रोलच्या संकल्पनेवर आधारित आहे.
  • या सिनेमा नयनतारा (Nayantara) शाहरुख खानसोबत दिसणार आहे.
  • सध्या दीपिका पदुकोण शाहरुख खानसोबत शूटिंगसाठी चेन्नईला पोहोचली आहे.

चेन्नई:  Deepika Padukone Shooting for Jawan:  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' (Jawaan) सिनेमा डबल रोलच्या संकल्पनेवर आधारित आहे. या सिनेमा नयनतारा (Nayantara)  शाहरुख खानसोबत दिसणार आहे. दरम्यान, शाहरुखच्या जवान या सिनेमात दीपिका पदुकोणचा  (Deepika Padukone) कॅमिओ दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

या सिनेमात दीपिका पदुकोण फ्लॅशबॅकमध्ये शाहरुख खानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या दीपिका पदुकोण शाहरुख खानसोबत शूटिंगसाठी चेन्नईला पोहोचली आहे.

अधिक वाचा-  वजन कमी करण्यासाठी Best पर्याय 'ग्रीन कॉफी',  जाणून घ्या फायदे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये दीपिका पदुकोण शूटिंगसाठी पोहोचताना दिसत आहे. साऊथचे लोकप्रिय दिग्दर्शक अॅटली या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी