Tv Serial First Promo: एकेकाळी हिट झालेल्या 'या' मालिकेचा सिक्वेल लवकरच, प्रोमो रिलीज

झगमगाट
Updated Aug 01, 2022 | 14:50 IST

Kahaani Ghar Ghar Kii First Promo: 'कहानी घर घर की' या टीव्ही मालिकेचा दुसरा सीझन सुरू होणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, निर्मात्यांनी मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे.

थोडं पण कामाचं
  • टेलिव्हिजन जगत नेहमीच लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
  • टीव्ही शो सुरू झाल्यानंतर ते टीआरपीच्या शर्यतीत धावू लागतात.
  • सध्या टीव्ही मालिकेचे निर्माते अशा मालिकांचं रिमेक करत आहेत.

मुंबई: Kahaani Ghar Ghar Kii Promo: टेलिव्हिजन जगत नेहमीच लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. असे अनेक टीव्ही शो दररोज सुरू होत असतात. टीव्ही शो सुरू झाल्यानंतर ते टीआरपीच्या शर्यतीत धावू लागतात. 

दरम्यान सध्या टीव्ही मालिकेचे निर्माते अशा मालिकांचं रिमेक करत आहेत ज्या कधीकाळी सुपरहिट झाल्या होत्या. त्यातच आता मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी टीव्हीवर हिट झालेली मालिका कहानी घर घर की (Kahani Ghar Ghar Ki) चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अधिक वाचा- संजय राऊतांना अटक, दुसऱ्या राऊतांनी सुरू ठेवला पत्रकार परिषदेचा सिलसिला

हो, अशी माहिती समोर आली आहे की, टीव्ही सीरियल कहानी घर घर की चा दुसरा सीझन सुरू होणार आहे. या मालिकेच्या सिक्वेलबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 


दरम्यान, निर्मात्यांनी मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. एकता कपूरच्या या मालिकेत साक्षी तन्वर  (Sakshi Tanwar)आणि श्वेता क्वात्रा (Shweta Kawatra) पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या मालिकेचा सीझन 2 लोकांना कितपत प्रभावित करतो हे पाहावे लागेल. मालिकेचा पहिला प्रोमो येथे पहा...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी