Raju Srivastav: गेल्या चार-पाच वर्षांपासून राजू श्रीवास्तव 'Heart Patient', डॉक्टरांची माहिती

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 14, 2022 | 14:52 IST

Raju Srivastav Health Updates:राजू श्रीवास्तव यांचे डॉक्टर विवेक गुप्ता यांनी सांगितले की, ते गेल्या चार-पाच वर्षांपासून हृदयाचे रुग्ण होते. ते आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक होते. जाणून घ्या काय म्हणाले राजू श्रीवास्तव यांचे डॉक्टर...

Raju Srivastav
राजू श्रीवास्तव 
थोडं पण कामाचं
  • प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आहे.
  • त्यांच्यावर सध्या नवी दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • कॉमेडियन आणि अभिनेते बरे होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नवी दिल्ली: Raju Srivastav doctor on his health: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava)  यांना हृदयविकाराचा झटका  (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉमेडियन आणि अभिनेते बरे होण्याची चिन्हे दिसत आहेत. राजू श्रीवास्तव यांचे खास मित्र आणि हृदयरोगतज्ज्ञ यांनी सांगितले की, त्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास होता आणि ते औषधेही घेत होते.

राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करणारे त्यांचे मित्र आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ विवेक गुप्ता यांनी टाईम्स नाऊ नवभारतला सांगितले की, 'मी राजू श्रीवास्तव यांना गेल्या चार-पाच वर्षांपासून ओळखतो. त्याला आधीच हृदयाचा त्रास होता. हृदयरोग हा कायमस्वरूपी नसतो. ते नियमित औषध घेत होते आणि त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक होते. 

अधिक वाचा-  विरारमध्ये एकाच कुटुंबातील 5 मुलांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

पुढे ते सांगतात की, त्यांच्यासोबत असे घडले असेल तर ते देशासाठी धक्कादायक आहे. मला आशा आहे की ते बरा होतील. मी अपोलो हॉस्पिटलमध्ये आहे पण त्यांना एम्समध्ये भेटायला जात आहे. राजूवर ही पहिलीच वेळ आहे की त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी