मुंबई: Jacqueline Fernandez Money laundering case: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Actress Jacqueline Fernandez) सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे (Money laundering case) वादात आहे. जॅकलिन फर्नांडिस आजकाल तिच्या मनःशांतीसाठी अध्यात्माच्या मार्गावर आहे. जॅकलिनने यापूर्वी ईडीसमोर (ED) कबूल केले होते की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने तिला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. ईडीने आपल्या पुरवणी आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून ठेवले आहे.
जॅकलिनशिवाय नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरने महागडे गिफ्टही दिले होते. आरोपपत्रात नोराला साक्षीदार मानले गेले आहे. यावर जॅकलिनच्या वकिलाने म्हटले आहे की, इतरांप्रमाणे तिचीही फसवणूक झाली आहे. अशा स्थितीत इतरांना साक्षीदार बनवून आरोपी बनवणे पूर्णपणे चुकीचे आहे. जॅकलिनच्या वकिलाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अभिनेत्रीच्या मुदत ठेवीतील पैसे हे तिच्या मेहनतीचे पैसे आहेत.
अधिक वाचा- जान्हवी कपूरचा साडीतला Hot Look, पाहून व्हाल घायाळ
काही दिवसांपूर्वीच ईडीने 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणाशी संबंधित आरोपपत्रात तिला आरोपी करण्यात आले, अशात अभिनेत्री जॅकलिनला मुंबईच्या एका मंदिरात पाहण्यात आले आहे. जिथून तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी बनवल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस सोमवारी मुंबईतील जुहू येथील मुक्तेश्वर मंदिरात जाताना दिसली.