मुंबई : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये आजच्या भागात पूर्वी स्वामींवर चेटूक करणारा एकनाथ आता त्यांचा भक्त झाला आहे. तो स्वामींना आपला देव मानत आहे. पण आता रामाचार्य आणि एकनाथ यांच्या वाद होतो आणि एकनाथ थेट रामाचार्यांची मानच पकडतो.
त्याचं झालं असं की स्वामी गावातून चालत जात असतात, त्याचवेळी काही गावकरी स्वामींच्या पाऊल खुणांवर पाय ठेवत असतात. त्यांना एकनाथ हटकतो, माझ्या देवांच्या पाऊल खुणांवर पाय ठेवू नका म्हणून तो गावकऱ्यांना हटकतो. तेवढ्याच रामाचार्य त्या ठिकाणी येतात आणि एकनाथचा पाण उतारा करतात.
हा व्यक्ती स्वामींवर चेटूक करत होता आता तो स्वामींच्या पायाशी लोळण घातल आहे. याचा एकनाथला राग अनावर होतो आणि तो थेट रामाचार्यांची मान धरतो. पाहा पुढे काय होईल आजच्या भागात