Shilpa Shinde: शिल्पा शिंदे करणार श्रीदेवीच्या 'या' गाण्यावर धमाकेदार Performance

झगमगाट
Pooja Vichare
Updated Sep 23, 2022 | 10:35 IST

Jhalak Dikkh La Jaa:झलक दिखलाजा (Jhalak Dikkh La Jaa) सीझन 10 मध्ये सर्व स्टार्स बॉलीवूड थीमवर (Bollywood theme) डान्स करणार आहेत.

Jhalak Dikkhla Jaa 10 Shilpa Shinde
शिल्पा शिंदेचा धमाकेदार Performance; पहा एक झलक  
थोडं पण कामाचं
  • या आठवड्यात झलक दिखलाजा (Jhalak Dikkh La Jaa) सीझन 10 मध्ये सर्व स्टार्स बॉलीवूड थीमवर (Bollywood theme) डान्स करणार आहेत.
  • अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) या शनिवारी श्रीदेवीच्या खास अवतारात दिसणार आहे.
  • शिल्पा शिंदेने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई: Jhalak Dikkhla Jaa 10 Shilpa Shinde: या आठवड्यात झलक दिखलाजा (Jhalak Dikkh La Jaa) सीझन 10 मध्ये सर्व स्टार्स बॉलीवूड थीमवर (Bollywood theme) डान्स करणार आहेत. त्याचवेळी अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) या शनिवारी श्रीदेवीच्या खास अवतारात दिसणार आहे. 

शिल्पा शिंदेने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती हिम्मतवाला चित्रपटातील श्रीदेवीचा लूक कॉपी करताना दिसत आहे. यादरम्यान शिल्पा शिंदेही श्रीदेवीच्या सिग्नेचर पोजची कॉपी करत आहे.

शिल्पा शिंदेचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर शिल्पाच्या या लूकचे जोरदार कौतुक करत आहे. 

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये शिल्पानं लिहिले की, 'झलक दिखलाजा सीझन 10 या आठवड्यात बॉलिवूड थीम असेल. मला दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या 'नैनो में सपना, सपने में सजना' या आयकॉनिक गाण्यावर परफॉर्म करण्याची संधी मिळाली आहे. 

अधिक वाचा- मुंबईत लोकलमध्ये घुसून महिलेचा विनयभंग, अंधेरीतली घटना

शिल्पा शिंदे याआधी बिग बॉस 11 चा भाग होती आणि ती या सीझनची विजेती होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी