मुंबई: Karan Aujla and Inder Chahal New Punjabi Video Song: करण औजला आणि इंदर चहल हे पंजाबी संगीत उद्योगातील सुप्रसिद्ध अभिनेते आणि गायक आहेत. करण औजलाची गाणी पंजाब, हरियाणापासून संपूर्ण भारतात गाजत आहेत, तर इंदर चहल आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अलीकडेच करण औजलाचे नवीन गाणे गिल्टी हे इंटरनेटवर रिलीज झाले आहे. ज्याने एकच धमाल उडवून दिली आहे. या गाण्यात इंदर चहल आणि श्रद्धा आर्या मुख्य भूमिकेत आहेत.
या गाण्याला अवघ्या काही तासांत ५ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यावरुन आपल्याला या गाण्याची लोकप्रियता लक्षात येईल. हे गाणे करण औजलाने आपला आवाज दिला आहे. तर गीतकार देखील तोच आहे. तर याला संगीत येह प्रूफ याने दिले आहे.