Kartik Aryan take dig on Sara Ali Khan: सारा अली खानच्या Ex च्या वक्तव्यानंतर कार्तिक आर्यनचा पलटवार, नाव न घेता अभिनेता म्हणाला...

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 26, 2022 | 16:50 IST

Kartik Aryan Reaction On Sara Ali khan Statement: सारा अली खानने कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये कार्तिक आर्यनचे नाव न घेता खिल्ली उडवली. आता कार्तिक आर्यनने त्यावर उत्तर दिलं आहे.

Kartik Aryan
कार्तिक आर्यन 
थोडं पण कामाचं
  • करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) शोच्या सातव्या सीझनमध्ये कार्तिक आर्यनचा (Karthik Aryan) उल्लेख केला जात आहे.
  • साराने कदाचित कार्तिक आर्यनचे नाव घेतले नसेल पण असे मानले जाते की अभिनेत्री त्याच्याकडे बोट करत होती.
  • कार्तिक आर्यनने हे उत्तर सारा अली खानसाठीच दिल्याचे सोशल मीडियावरील चाहत्यांचे मत आहे.

मुंबई: Kartik Aryan on Sara Ali Khan comment:  करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'  (Koffee With Karan) शोच्या सातव्या सीझनमध्ये कार्तिक आर्यनचा (Karthik Aryan)  उल्लेख केला जात आहे. दुस-या एपिसोडमध्ये सारा अली खानला विचारलं जातं की, तुझा एक्स एक्स का आहे? यावर सारा अली खान (Sara Ali Khan) म्हणते की, कारण तो सर्वांचा एक्स आहे. 

अधिक वाचा-  दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूचा कहर, मृतांचा आकडा 28 वर; 47 जणांची प्रकृती चिंताजनक

साराने कदाचित कार्तिक आर्यनचे नाव घेतले नसेल पण असे मानले जाते की अभिनेत्री त्याच्याकडे बोट करत होती. आता कार्तिक आर्यननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मीडिया मुलाखतीत, सारा आणि करण जोहरचे नाव न घेता, कार्तिक आर्यन म्हणाला की, तो रॅपिड फायर राउंडसह शोमध्ये लोकप्रिय आहे याचा मला आनंद आहे. 

कार्तिक आर्यनने हे उत्तर सारा अली खानसाठीच दिल्याचे सोशल मीडियावरील चाहत्यांचे मत आहे. त्याच मुलाखतीत कार्तिक आर्यनला विचारण्यात आले की, तो एखाद्या अवॉर्ड शोमध्ये त्याच्या एक्सला भेटेल तर? त्यावर अभिनेत्याने उत्तर दिले की, तो तिला आदराने भेटेल आणि तिच्या मागे कधीही बोलणार नाही. तसेच तो कधीही त्याच्या एक्स विरुद्ध अफवा पसरवणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी