Khatron Ke Khiladi 12: निशांत भट्टवर डुकराचा हल्ला, स्टंट करताना स्पर्धकाची झाली वाईट अवस्था

झगमगाट
Updated Jul 22, 2022 | 14:19 IST

Pig Bites Nishant Bhat: रोहित शेट्टीच्या लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 12 चा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यानंतर चाहते निशांत भट्टसाठी खूप चिंतेत झाले आहेत. स्टंट करत असताना एक डुक्कर निशांत भट्टवर हल्ला करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

थोडं पण कामाचं
  • रोहित शेट्टीच्या लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 12 चा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
  • ज्यानंतर चाहते निशांत भट्टसाठी खूप चिंतेत झाले आहेत.
  • स्टंट करत असताना एक डुक्कर निशांत भट्टवर हल्ला करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मुंबई: Khatron Ke Khiladi 12 Updates:  रोहित शेट्टीचा लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 12 सध्या खूप चर्चेत आहे. या शोचे सर्व स्पर्धक खतरों का खिलाडी बनण्यासाठी खूप मेहनत करताना दिसत आहेत. 

अधिक वाचा-  Amazon Prime Day Sale 2022: जवळपास अर्ध्या किंमतीला मिळतील स्मार्टफोन, 'या' मोबाईलवर असेल बंपर सूट

या टीव्ही शोचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यानंतर निशांत भट्टचे चाहते त्याच्यासाठी खूप चिंतेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये निशांत भट्ट आणि तुषार कालिया एकत्र स्टंट करताना दिसत होते.

या स्टंटदरम्यान त्याचा सामना डुकरांशी झाला. स्टंट पूर्ण करण्यासाठी त्याला डुकरांच्या ताफ्यात प्रवेश करावा लागला. निशांत भट्ट जेव्हा डुकरांच्या कळपात जातो तेव्हा एक डुक्कर त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला चावू लागतो. निशांत भट्टची प्रकृती इतकी बिघडते की तो घरी जाण्याचा आग्रह धरतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी