Kriti Sanon: कॉफी विथ करणमध्ये क्रिती सॅनॉननं केला रिलेशनशिप स्टेट्सवर खुलासा; म्हणाली, 'बॉलिवूडमध्ये...'

झगमगाट
Pooja Vichare
Updated Sep 02, 2022 | 18:28 IST

Kriti Sanon in Koffee With Karan Seven: कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये गेस्ट म्हणून क्रिती सॅनॉन (Kriti Sanon ) सामील झाली आहे. यावेळी क्रिती सॅनॉनने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे. जाणून घ्या काय म्हणाली कृती सॅनॉन.

Kriti Sanon in Koffee With Karan
कॉफी विथ करण 
थोडं पण कामाचं
  • कॉफ़ी विथ करण (Koffee With Karan) सीझन 7 मध्ये काऊचवर टायगर श्रॉफ आणि कृती सॅनॉन (Kriti Sanon ) आले.
  • यादरम्यान दोघांनी त्यांच्या लव्ह लाईफमधील अनेक गुपिते शेअर केली आहेत.
  • तिला चांगले काम करण्याची प्रेरणा त्या अभिनेत्रीकडून मिळते.

मुंबई: Kriti Sanon:  कॉफ़ी विथ करण  (Koffee With Karan) सीझन 7 मध्ये काऊचवर  टायगर श्रॉफ आणि कृती सॅनॉन (Kriti Sanon ) आले. यादरम्यान दोघांनी त्यांच्या लव्ह लाईफमधील अनेक गुपिते शेअर केली आहेत. शोमध्ये क्रिती सॅनॉनने स्पष्टपणे सांगितले की ती सिंगल आहे आणि आदित्य रॉय कपूरला डेट करत नाही. 

क्रिती सॅनॉन म्हणाली की, बॉलीवूडमध्ये एकही हॅडसम मुलगा नाही जिच्यासोबत ती चांगली दिसू शकेल. 

अधिक वाचा-  'भाग्य दिले तू मला' मध्ये बाप्पाच्या नैवेद्याची जय्यत तयारी

ती म्हणते की,  'मी आणि आदित्य रॉय कपूर एकत्र छान दिसतो पण तुम्ही मला ओळखता. हो आम्ही बोलत होतो. तो एक अतिशय मनोरंजक व्यक्ती आहे. 

आलिया भट्टसाठी क्रिती म्हणाली की, तिला चांगले काम करण्याची प्रेरणा त्या अभिनेत्रीकडून मिळते. 

विशेष म्हणजे क्रितीला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर क्रिती म्हणाली, 'इंडस्ट्रीबाहेर अनेक लोक आहेत जे स्वप्न पाहतात. आपण नेहमी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी