KRK: केआरकेचा पुन्हा आमिर- शाहरूख खानवर निशाणा; म्हणाला, मिस्टर परफेक्शनिस्टचं करिअर संपलं

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 13, 2022 | 15:23 IST

KRK On lal singh chaddha: केआरकेने पुन्हा एकदा आमिर खान (Aamir Khan) आणि शाहरुख खानवर (Shah Rukh Khan) जोरदार निशाणा साधला आहे.

KRK
केआरके 
थोडं पण कामाचं
  • कमाल राशीद खान (Kamal Rashid Khan) उर्फ ​​केआरके (KRK) आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो.
  • केआरकेने पुन्हा एकदा आमिर खान (Aamir Khan) आणि शाहरुख खानवर (Shah Rukh Khan) जोरदार निशाणा साधला आहे.
  • केआरकेनं आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमावर खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

मुंबई:  KRK target bollwood khan's: कमाल राशीद खान (Kamal Rashid Khan) उर्फ ​​केआरके (KRK)  आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरकेने पुन्हा एकदा आमिर खान (Aamir Khan) आणि शाहरुख खानवर (Shah Rukh Khan) जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये अभिनेत्याने आमिर खानचा लाल सिंह चड्ढा, शाहरुख खानचा पठाण यांचा उल्लेख केला आहे.

केआरकेने यासह जाहीर केलं की, त्याने परफेक्शनिस्टची कारकीर्द संपवली आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये बॉलिवूडच्या तीन खानांवर निशाणा साधला आहे. केआरकेनं आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमावर खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. 

अधिक वाचा- रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भावानं केला मोठा प्रताप, थेट पोहोचला तुरूंगात

असे असतानाही आमिरने केआरकेला सिनेमाच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित केले. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या सिनेमावरील बहिष्कार आणि नकारात्मकतेचा परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही दिसून येत आहे.

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी