मुंबई: Liger New Song Aafat Release: सध्या विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) त्यांच्या आगामी 'लाइगर' (Liger Movie) सिनेमासाठी चर्चेत आहेत. हा सिनेमा 25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दोन्ही स्टार्स बिझी आहेत. दरम्यान, 'लाइगर' सिनेमाचं नवं गाणं 'आफत' मेकर्सनं रिलीज केलं आहे. सिनेमातील हे रोमँटिक गाणं आहे. आफत या गाण्यात अभिनेता विजय आणि अनन्याची केमिस्ट्री बघायला मिळतेय.
अधिक वाचा- रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर बनवा स्पेशल चॉकलेट बर्फी,जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी
विजय आणि अनन्या एकमेकांसोबत खूप छान दिसत आहेत. लाइगरचे नवीन गाणे प्रेक्षकांना खूप प्रभावित करत आहे. विजय देवरकोंडाचा हा बॉलिवूड डेब्यू सिनेमा आहे, तर अनन्या या सिनेमाद्वारे तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं आहे. या बहुचर्चित सिनेमातून दिग्गज बॉक्सर माईक टायसन भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमात रम्या कृष्णन देखील दिसणार आहे.