सैन्याच्या जवानांप्रमाणे लहान मुलाने केली परेड, व्हिडिओ पाहून तुम्हालाही लिटिल चॅम्पचा वाटेल अभिमान

झगमगाट
Updated Jul 22, 2022 | 14:34 IST

Little Boy Parade Viral Video: सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एकदम जबदस्त अंदाजात परेड करताना पाहायला मिळत आहे.

Little Boy Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ हसवणारे असतात, तर काही डोळे पाणावणारे असतात. त्याचबरोबर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपली छाती अभिमानाने फुलून येते आणि तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. 

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर आता पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस मुलगा व्हिडिओमध्ये अतिशय तन्मयतेने परेड करताना पाहायला मिळतोय. त्या मुलाच्या निरागसतेने लोकांना अक्षरश: भुरळ घातली आहे. 

व्हिडिओमध्ये निरागस बालक एखाद्या सैनिकांप्रमाणे परेड करताना दिसत आहे. तो ज्या पद्धतीने परेड करत आहे त्याने अनेक लोकांची मने जिंकली आहेत. काही लोक तर म्हणतात की, तो मोठा झाल्यावर पक्का सैनिक होईल. तर तुम्हीही या व्हिडिओमध्ये पाहा मुलाची क्यूट स्टाइल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी