मुंबई: बिग बॉस १३ मधील स्पर्धक रश्मी देसाई आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आली आहे. अगदी लहान वयातच अभिनयातून आपली ओळख निर्माण करणारी रश्मी देसाई आज यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रश्मी देसाईने बिग बॉसमधील तिच्या प्रवासाविषयी बोलताना सांगितले की, ती टॉप ३ मध्ये न येणे हे खूपच शॉकिंग आहे. ती पुढे म्हणाली की, बिग बॉसमधील तिचा प्रवास सोपा नव्हता. तिथे कुणीही तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि ती म्हणाला की बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिचे आयुष्य खूप बदलले आहे.
नात्यांबाबत बोलताना ती म्हणाली की, ती लोकांशी फार लवकर अटॅच होते आणि त्यातून बाहेर पडण्यास तिला बराच वेळ लागतो. रश्मी देसाईने बिग बॉसच्या उर्वरित स्पर्धकांचे देखील कौतुक केले आणि जनतेचे प्रेम हीच तिची विजयी ट्रॉफी असल्याचं म्हटलं.