मुंबई: Malaika Arora talks Business venture: मलायका अरोरा (Malaika Arora) चित्रपटांव्यतिरिक्त वेगवेगळ्या ब्रँड्सना एंडोर्स करत असते. फूड, स्किन केअर, फिटनेस (food, skin care, fitness) अशा अनेक उद्योगांशी अभिनेत्री निगडीत आहे. अभिनेत्रीने भारतात Ahikoza ब्रँड लॉन्च केला आहे.
अहिकोजा या तिच्या अपकमिंग वेंचरविषयी तिनं सांगितलं आहे. अभिनेत्रीने सांगितले की, मला नेहमी व्यवसायात गुंतवणूक करायला आवडते. अहिकोजाच्या संस्थापक नम्रता कराड यांना मी भेटली तेव्हा त्यांच्या कल्पनेने मी खूप प्रभावित झाले. अहिकोजा हा अॅक्सेसरीजचा ब्रँड आहे.
अधिक वाचा- मुसळधार पावसात अडकले संपूर्ण गाव, ढगफुटी सदृश्य पावसाचा Live Video
पुढे मलायका अरोरा म्हणाली की, महिलांनी नेहमीच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असले पाहिजे. अभिनेत्री म्हणाली की, तुमच्याकडे नेहमी प्लॅन बी असायला हवा.
अर्जुन कपूरने तिला या व्यवसायासाठी खूप पाठिंबा दिला असल्याचं यावेळी मलायकानं सांगितलं आहे. मला आशा आहे की लोकांना हा ब्रँड आवडेल अशी अभिनेत्री म्हणाली.