मुंबई: जुगराज संधू पंजाबी संगीत क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. जुगराजची गाणी इंटरनेटवर रिलीज होताच बरीच व्हायरल होतात. नुकतेच जुगराजचे नवीन गाणे लाहोर इंटरनेटवर रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये माही शर्मा देखील दिसत आहे. या दोघांची ही उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. माहीबरोबर जुगराज गाण्यात जबरदस्त डान्स करत आहे. या गाण्याचे चित्रीकरण एका रोमँटिक पद्धतीने केले गेले आहे. त्याचबरोबर गाण्याला आतापर्यंत १३ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाली आहेत.