मुंबई: R Madhavan talk About Rocketry The Nambi Effect: बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor), लेखक आणि दिग्दर्शक आर माधवन (R Madhavan) सध्या त्याच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' (Rocketry: The Numby Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' 1 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. ही कथा इस्रोचे माजी शास्त्रज्ञ (Former ISRO scientist) आणि एरोस्पेस इंजिनिअर नंबी (Aerospace engineer Nambi) यांची आहे. ज्यांच्यावर हेरगिरीचा खोटा आरोप लावण्यात आला होता.
'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' हा सिनेमा आर माधवनसाठी खास आहे, कारण त्याने यात केवळ अभिनयच केला नाही तर तो या सिनेमाचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे.
अधिक वाचा- सेल्फी घेण्यासाठी चाहत्याचं धक्कादायक कृत्य, संतापला Shah Rukh Khan; आर्यननं केली मध्यस्थी
सिनेमाच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर, आता आर माधवन आणि शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी टाइम्स नाऊ नवभारतच्या मुख्य संपादक नाविका कुमार यांच्यासोबत त्यांच्या सिनेमाच्या शूटिंग, कथा आणि चढ-उतारांबद्दल स्पष्टपणे संवाद साधला आहे. नाविका कुमार यांच्या आर माधवन आणि नंबी नारायण यांच्याशी झालेल्या संभाषणाचे हे ठळक मुद्दे...
'रॉकेट्री' सिनेमाचा प्रीमियर 19 मे रोजी 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात झाला. येथे आर माधवनने या सिनेमासाठी बरीच प्रशंसा मिळवली. आर माधवन दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख खान आणि सूर्या special appearances दिसले आहेत. रॉकेट्री: नंबी इफेक्ट हिंदी, तमिळ आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये एकाच वेळी शूट करण्यात आला आहे. हा सिनेमा तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्येही रिलीज झाला आहे.