नवी दिल्ली: Raju Srivastav Brother on Health Update: राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीतील (Delhi) एम्स रुग्णालयात (AIIMS hospital) जीवन मरणाची झुंज देत आहेत. सोशल मीडियावर (social media) राजू यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा (Rumors) येत आहेत. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनीही निवेदन जारी केलं आहे.
आता राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले आहे. दीपू श्रीवास्तव यांनी हा व्हिडीओ जारी करून भावाच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
अधिक वाचा- 'या' लोकांसाठी घातक असतं तूप खाणं
दीपू म्हणाले, 'तुमच्या सर्वांचे लाडके, आमचे मोठे बंधू गजोधर भैय्या राजू जी एम्स हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आहेत.
देशातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर त्यांच्यावर उत्तम रुग्णालयात उपचार करत आहेत. त्याची तब्येतही चांगली आहे. सर्वांच्या प्रार्थना काम करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या खोट्या अफवांकडे लक्ष देऊ नका. राजू भाई हे लढवय्ये आहेत आणि लवकरच लढाई जिंकून चाहत्यांमध्ये येतील.