राखी सावंतनं पापाराझीसमोर फ्लॉन्ट केला बेबी बंप, Video झाला Viral; अभिनेत्री म्हणाली, ''बाळाचे वडील...''

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 13, 2022 | 14:28 IST

Rakhi Sawant Pregnancy Prank Video: सध्या राखी आपला बॉयफ्रेंड आदिलसोबत बऱ्याचदा पापाराझीसमोर पोझ देताना दिसते. पण आता राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Rakhi Sawant
राखी सावंत 
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते.
  • राखीचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
  • आता राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई: Rakhi Sawant Pregnancy Prank Video: अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. राखीचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या राखी आपला बॉयफ्रेंड आदिलसोबत बऱ्याचदा पापाराझीसमोर पोझ देताना दिसते. पण आता राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती प्रेग्नेंसी प्रँक करताना दिसत आहे.

अधिक वाचा- महत्त्वाची बातमी:  रूग्णवाहिकेसाठी लक्षात ठेवा 'हे' दोन नंबर,  Emergency काळात येतील मदतीस

या व्हिडिओमध्ये राखी सावंत दोन फुग्याच्या मदतीने बेबी बंप दाखवताना दिसत आहे. हे मूल कोणाचे आहे, असे विचारल्यावर ती म्हणते, 'आकाशातून आले आहे, पवित्र आहे. होय, आदिल जो माझ्या हृदयात आहे, तोच वडील आहे. 

यानंतर अभिनेत्री म्हणाली की, तिची मुले मसिहा आहेत, ती म्हणाली की देवाने तिला सांगितले आहे की, ती मसिहाला जन्म देणार आहे. यानंतर या अभिनेत्रीचे सत्य समोर आले जेव्हा एका व्यक्तीने राखी सावंतचा फुगा फोडला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी