Jhalak Dikkhla Jaa: 'या' अभिनेत्रीसमोर Rubina Dilaik ला दाखवायचं आहे स्वतःचं Talent

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 28, 2022 | 12:25 IST

Jhalak Dikkhla Jaa 10: झलक दिखलाजा या रिअॅलिटी शोच्या 10व्या सीझनमध्ये रुबिना दिलीकही दिसणार आहे. रुबिना दिलीकने मुलाखतीत सांगितले की, तिला हा शो नेहमीच करायचा होता. जाणून घ्या काय म्हणाली रुबिना दिलीक...

Jhalak Dikkhla Jaa 10
रूबिना 
थोडं पण कामाचं
  • झलक दिखलाजाचा(jhalak dikhhla jaa) 10वा सीझन 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
  • या सीझनमध्ये बिग बॉस 15 ची विजेती रुबिना दिलीक (Rubina Dilik) देखील सहभागी होत आहे.
  • रुबिना दिलीक रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्येही दिसली आहे.

मुंबई: Rubina Dilaik on Jhalak Dikhla Jaa 10: झलक दिखलाजाच(jhalak dikhhla jaa)ा    10वा सीझन 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या सीझनमध्ये बिग बॉस 15 ची विजेती रुबिना दिलीक (Rubina Dilik) देखील सहभागी होत आहे. या निमित्तानं रूबिनानं टेली टॉक इंडियाशी संवाद साधला आहे. (Tele Talk India)  (Rubina Dilaik wants to show her talent to Madhuri Dixit preparation for Jhalak Dikhhlaja 10)

रुबिना दिलीकने टेली टॉक इंडियाशी बोलताना  सांगितले की, 'जर एखादा शो असेल ज्यासाठी मी मनापासून प्रार्थना केली असेल तर तो झलक दिखलाजा आहे. पाच वर्षांपासून हा शो आला नव्हता. मला माधुरी दीक्षित यांच्यासमोर नाचायचे आहे. 

अधिक वाचा-  वजन कमी करायचे आहे पण दिवसभर भूक लागते, मग क्रेव्हिंग कमी करण्यासाठी खा 'या' 5 गोष्टी

पुढे रूबिनी दिलीक म्हणते की, त्यांच्यामुळेच मला हा शो करायचा होता. मला माझं  टॅलेंन्ट त्यांना दाखवायच आहे. मी खूप प्रार्थना केली आणि शेवटी शो माझ्याकडे आला.

रूबिनानं पुढे म्हटलं की, योग्य वेळेनुसार सर्व काही मिळतं. तुम्हाला फक्त त्या खास प्रसंगासाठी तयार राहावे लागते. मला वाटते की मी तयार आहे. मला हे कधीच हलके घ्यायचे नाही. विशेष म्हणजे रुबिना दिलीक रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्येही दिसली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी