Sapna Choudhary: 'दामन' या नव्या गाण्यावर ठुमकली सपना चौधरी, डान्स बघून चाहते घायाळ

झगमगाट
Updated Aug 06, 2022 | 14:47 IST

Sapna Choudhary New Song Out:प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीचे नवीन गाणे दामन यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत 07 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

थोडं पण कामाचं
  • प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीचे (Sapna Choudhary) नवीन गाणं दामन (Daman) यूट्यूबवर (Youtube) धुमाकूळ घालत आहे.
  • हे गाणे सपना चौधरी आणि ध्रुव सिंघलवर शूट करण्यात आले आहे तर हे गाणे अक्की आर्यनने गायले आहे.
  • या गाण्याचं संगीत राकेश माजेरिया यांचं आहे.

नवी दिल्ली: Sapna Choudhary song Daman: प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीचे (Sapna Choudhary)  नवीन गाणं दामन (Daman) यूट्यूबवर (Youtube) धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात सपना चौधरीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. 

सपना चौधरीची स्टाईल (Sapna Chaudhary's style)  अशी आहे की तिच्या स्टाइलवर चाहत्यांना वेड लागलं आहे. दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत 07 लाखांहून अधिक व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. 

हे गाणे सपना चौधरी आणि ध्रुव सिंघलवर शूट करण्यात आले आहे तर हे गाणे अक्की आर्यनने गायले आहे. 

अधिक वाचा- मुंबईकरांना 'स्वाईन फ्लू'चा धोका, महागड्या लॅब टेस्टमुळे नागरिक त्रस्त

या गाण्याचं संगीत राकेश माजेरिया यांचं आहे. हे गाणे पार्टीसाठी परफेक्ट आहे. हे गाणे स्वत: सपना चौधरीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी