Shamita Shetty And Raqesh Bapat: शमिता शेट्टी-राकेश बापट यांचं पुन्हा जुळलं नातं?, पापाराझीला दिली एकत्र पोझ

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 09, 2022 | 13:08 IST

Shamita Shetty And Raqesh Bapat Spotted Together: शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे नुकतेच ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर, हे कपल त्यांच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करताना स्पॉट झाले.

Shamita Shetty And Raqesh Bapat
शमिता शेट्टी आणि राकेश बापट 
थोडं पण कामाचं
  • शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते.
  • बिग बॉसपासून सुरू झालेली या दोघांची प्रेमकहाणी काही दिवसांपूर्वीच संपली.
  • मात्र ब्रेकअपनंतर शमिता आणि राकेश नुकतेच एकत्र दिसले.

मुंबई: Shamita Shetty And Raqesh Bapat Spotted Together After Break-up: शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. बिग बॉसपासून सुरू झालेली या दोघांची प्रेमकहाणी काही दिवसांपूर्वीच संपली. या दोघांनी त्यांच्या ब्रेकअपची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताच सगळेच चक्रावून गेले. मात्र ब्रेकअपनंतर शमिता आणि राकेश नुकतेच एकत्र दिसले. 

दोघंही त्यांचा नवीन म्युझिक व्हिडिओ तेरे विचार रब दिस्दाच्या प्रमोशनदरम्यान एका कार्यक्रमात स्पॉट झाले. याठिकाणी त्यांच्या नवीन म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनसोबतच दोघांनीही एकमेकांसोबत भरपूर पोझही दिल्या.

अधिक वाचा-  महागड्या केराटिन ट्रीटमेंटचे 'हे' आहेत साइड इफेक्ट्स

राकेश बापट आणि शमिता शेट्टीच्या ब्रेकअपची घोषणा करताना शमिता शेट्टीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर  लिहिले की, 'मला वाटते की गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक होते. राकेश आणि मी गेल्या काही काळापासून एकत्र नव्हतो.

हे संगीत व्हिडिओ सर्व रसिक चाहत्यांसाठी आहेत ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. आता वैयक्तिकरित्या आम्हा दोघांवर तुमचे प्रेम ठेवा. तुम्हा सर्वांना खूप सारे प्रेम आणि तुमच्या प्रेमाबद्दल आभार .' शमिता व्यतिरिक्त राकेश बापटने देखील सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी एक नोट लिहून ब्रेकअपची घोषणा केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी