मुंबई: shanaya Kapoor Bollywood Debut Film Bedhadak Gets Shelved: बॉलिवूड अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Mahip Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) करण जोहरच्या (Karan Johar) 'धडक' (Dhadak) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण आता शशांक खेतान (Shashank Khaitan) दिग्दर्शित 'बेधडक' (Bedhadak) हा सिनेमा रखडल्याचे बोललं जात आहे.
झूमशी बोलताना एका सूत्राने माहिती दिली की, करण जोहरचा सिनेमा सध्यातरी बंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शनाया कपूर आता तिच्या बॉलिवूड प्रवासाची सुरुवात दुसऱ्या कोणत्या सिनेमातून करणार का, असा प्रश्न आता लोकांच्या मनात निर्माण होत आहे.
सध्या शनाया कपूर आणि धर्मा प्रॉडक्शनकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. करण जोहरनं या वर्षी घोषणा केली होती की तो शनाया कपूरला लॉन्च करणार आहे.