मुंबई: Shetkarich Navra Hawa Today: रेवा आपल्या गावातला कार्यक्रम संपवून शहराकडे निघाली आहे. पण शहराकडे जाताना तिचा चेहरा उतरला आहे. दोन दिवसांनंतर ती पुन्हा रूपालीच्या लग्नासाठी गावात परत येणार आहे. या प्रवासात सयाजी आणि रेवाचा चांगला संवाद झाला. सयाजीनं आपण शहरातून गावात परत का आलो याबाबत आपलं मन मोकळं केलंय.
तुझ्या लग्नात गावात परत येईन असं वचन ही रेवानं सयाजीला दिलं आहे. तेव्हा सयाजीनं नाती आणि माती जपणारी मुलगी हवी आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे रेवा सयाजीसाठी मुलगी शोधणार का? यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसंच गावातून निघताना रेवाचा चेहरा का पडलेला आहे हा प्रश्नानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
अधिक वाचा- ...अन् वडिलांची 'ती' आठवण सांगत गहिवरल्या पंकजा मुंडे