Jhalak Dikhhla Jaa 10: शिल्पा शिंदेनं चाहत्यांकडून मागितले बर्थडेचं स्पेशल गिफ्ट, म्हणाली...

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 28, 2022 | 12:54 IST

Jhalak Dikhhla Jaa 10:बिग बॉस सीझन 11 ची (Bigg Boss season 11) विजेती आणि भाबीजी घर पर हैं ची अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) झलक दिखलाजा 10 शोमधून कमबॅक करत आहे.

Shilpa Shinde
शिल्पा शिंदे 
थोडं पण कामाचं
  • शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) झलक दिखलाजा 10 शोमधून कमबॅक करत आहे.
  • शिल्पा शिंदे आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
  • विशेष म्हणजे झलक दिखलाजाचा 10वा सीझन 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

मुंबई: Shilpa Shinde on Jhalak Dikhhla Jaa: बिग बॉस सीझन 11 ची (Bigg Boss season 11)  विजेती आणि भाबीजी घर पर हैं ची अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे (Shilpa Shinde)  झलक दिखलाजा 10 शोमधून कमबॅक करत आहे.  (Shilpa Shinde asked for special birthday gift from fans said God has given you one more chance Jhalak Dikhhla Jaa Season 10)

शिल्पा शिंदे आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. टेली टॉक इंडियाशी खास बातचीत करताना शिल्पा शिंदे म्हणाली, 'ज्यांनी मला बिग बॉसमध्ये कमी प्रेम दिले त्यांना देवाने आणखी एक संधी दिली आहे. मी खूप कमी काम करते.

अधिक वाचा-  वजन कमी करायचे आहे पण दिवसभर भूक लागते, मग क्रेव्हिंग कमी करण्यासाठी खा 'या' 5 गोष्टी

पुढे शिल्पा सांगते की, माझ्या आई-वडिलांनी मला शिकवले आहे की, तुला जे मिळेल त्यात तू नेहमी आनंदी रहा. या वाढदिवशी मला माझ्या चाहत्यांनी मला मत द्यावे अशी भेट हवी आहे. भरपूर मते द्या. 

माझ्या डान्समध्ये काही उणीव असेल तर तुम्ही मला मत द्या, असं शिल्पानं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे झलक दिखलाजाचा 10वा सीझन 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. शिल्पा शिंदे व्यतिरिक्त रुबिना दिलीक, निया शर्मा, पारस कालनावत यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी